Gazette/राजपत्र

 

गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे


गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे
1)एक फोटो
2)आधार कार्ड/पॅन कार्ड/इलेक्शन कार्ड/ पासपोर्ट
3)राशन कार्ड/लाईट बिल
(आधार कार्डवर पत्ता बरोबर असेल तर (3)नंबर मध्ये जे डॉक्युमेंट आहेत त्यांची गरज नाही जर पत्ता जुन्या ठिकाणी राहात असाल तिकडचा असेल तर यातील एक घ्यावा म्हणजे राशन कार्ड किंवा लाईट बिल)
4)जन्म दाखला/शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट
5)जुने नाव आणि नवीन नाव
6) मोबाईल नंबर
7)मॅरेज सर्टिफिकेट किंवा 100 च्या बॉंड पेपर वर प्रतिज्ञापत्र.
08) SC,ST साठी जातीचा दाखला


गॅझेट बनवण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत

1)एखाद्या व्यक्तीची दोन वेगवेगळी नावे आहेत व त्या व्यक्तीला दोन्ही नावाचा वापर करायचा आहे तर तो व्यक्ती गॅजेट चा वापर करू शकतो याच्या वापराने तो सरकारी व प्रायव्हेट दोन्ही ठिकाणे आपली कागदपत्रे वापरू शकतो

2) नवीन लग्न झाल्यानंतर पत्नीचे नाव हे काही धर्मांमध्ये बदलून नवीन ठेवले जाते . पत्नीचे सर्व कागदपत्र हे लग्नाच्या अगोदर च्या नावाने असतात त्यामुळे तिला नोकरीसाठी व सरकारी कामांमध्ये अडचण येते यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गॅझेट ची सुविधा आहे जर त्या व्यक्तीने ग्याजेट बनवले तर ती व्यक्ती लग्नाच्या अगोदर चे नाव ही वापरू शकते व लग्नाच्या नंतरचे नाव ही वापरू शकते

3) मुस्लिम बांधवांची नावे काहीवेळा आम्ही बघतो
अब्दुल करीम ऐवजी अ.करीम
अब्दुल सत्तार ऐवजी अ.सत्तार
मोहम्मद जावेद ऐवजी म.जावेद असतात अशा प्रकारे असतात यासाठी त्यांनी जर गॅजेट केले तर कुठल्याही सरकारी कामासाठी ती व्यक्ती अब्दुल करीम आणि करीम दोन्ही नावाची पुरावे वापरू शकतात कारण गॅझेटमध्ये दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे याचा उल्लेख असते

4)एखाद्या व्यक्तीचे नाव काही कागदपत्रांवर वेगळे व काही कागदपत्रांवर वेगळे असे झाले असेल तर ती व्यक्ती ही गॅजेट करू शकते गॅझेट केल्यानंतर त्याचे जे नाव बरोबर आहे त्या नावाचं ती व्यक्ती सर्व ठिकाणी वापर करू शकते.

5) जन्मतारीख चुकले असेल तर जी जन्मतारीख बरोबर आहे त्यासाठीही गॅझेट चा वापर करू शकतो.
 
 
*****************************************************************************************

आम्ही आपल्याला घरी बसल्या प्रमाणपत्र  काढुन देऊ तुमचे कागदपत्र आम्हाला Whatsapp किंवा E-mail ने पाठवा.

Whatsapp No - 7666308686              E-mail - rajdigitaldahiwel@gmail.com


Post a Comment

Previous Post Next Post